मराठी पत्रकारितेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्रकारितेचे योगदान
收藏资源简介:
वृत्तपत्रातून समाजाच्या चालू स्थितीचे दर्शन घडत असते. समाजाच्या प्रगतीसाठी वर्तमानपत्रे महत्त्वाची भूमिका बजावतात असे स्पष्ट मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केले होते. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी वर्तमानपत्रासारखे इतर माध्यम असूच शकणार नाही. केवळ सभा संमेलने घेवून विचार लोकापर्यंत पोहचणार नाहीत तर, चिरकाल टिकणारे विचार लेखन प्रकारात समोर यावे लागतील असेही ते म्हणत. म्हणूनच डॉ. बाबासाहेब जेंव्हा परदेशातून उच्य शिक्षण घेवून परत आले तेव्हा त्यांनी वर्तमानपत्राचा मार्ग स्विकारला. त्यातून मग मूकनायकाचा जन्म झाला आणि ही परंपरा बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुद्ध भारत अशी करत पुढे सरकत गेली. बहिष्कृत भारताच्या २२ एप्रिल १९२७ च्या अग्रलेखात त्यांनी चवदार तळ्याच्या पाणीप्रश्नावर 'धर्मसंगर' या अग्रलेखात परखड मत व्यक्त केले. समाजात लोकजागृती करण्यासाठी लोकभाषा हेच माध्यम प्रभावी ठरले. त्यामुळे बाबासाहेबांची ग्रंथ संपदा जरी इंग्रजी भाषेतील असली तरी जनसामान्यात प्रबोधन करण्यासाठी मराठी भाषेतील वृत्तपत्रे स्थापून मराठी भाषेला इंग्रजी वळण लागू दिले नाही. मराठी मन, मराठी भाषा व मराठी संस्कृती जापणाऱ्या माणसाला उरेपण व उसनेपणाची आवश्यकता नसते. भावविश्वात किंवा स्वप्नाळू जगात हरवून न जाता महामानव प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय मूल्याची जाणीव जागृत ठेवली याची जाणीव मराठी पत्रकारिताही साक्ष देते याबद्दल दुमत नाही.



